कुसुमाग्रजांना पत्र

आदरणीय कुसुमाग्रजजी,
 आम्ही फारच धन्य आहोत जे आम्ही या मराठी मातीत जन्माला आलो. तुमच्यासारखे महान साहित्यकार आम्हाला लाभले आणि त्यामुळेच आज मराठी भाषा समृद्ध झाली हे आम्ही आमचं भाग्यच समजतो. तुम्ही मराठी भाषेतील केलेल्या विकासामुळेच १९८७ साली तुम्हाला 'ज्ञानपीठ' पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात आले. आणि म्हणूनच तुमचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा जागतिक मराठी राजभाषा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
 मराठी साहित्य आणि संस्कृतीचा विकास करत पदोपदी तुम्ही मराठीचे महत्त्व दाखवून दिले आहे. परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी। माय मराठी मरते इथे परकीचे पद दाबू नका।। भाषा मारता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे। गुलाम भाषिक होऊनि आपल्या प्रगतीचे शीर कापू नका।।
ह्या तुम्ही लिहिलेल्या ओळींमधून भाषेचे महत्त्व स्पष्ट होते. तरी आज दुर्दैवाने some people think that using English language rather than Marathi will increase their standard of living और कुछ लोगों को मराठी से ज्यादा हिंदी में बात करना अच्छा लगता है। आजच्या तरुण पिढीला महाराष्ट्रात राहून देखील मराठी भाषेत बोलायला लाज वाटते. आज कित्येक मराठी बांधवाना मराठी लेख वाचणे, मराठी चित्रपट पाहणे, मराठी काव्य, गीतं ऐकणे हे सर्व कंटाळवाणे वाटते. तुम्ही ज्या भाषेच्या विकासासाठी स्वतःचं संपूर्ण जीवन अर्पण केलं त्या भाषेची आज अशी अवस्था झाली आहे. मात्र त्याचप्रमाणे आज देखील कितीतरी महान व्यक्ती आणि संस्था मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत. त्यातच ' भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, भाषा सल्लागार समिती, मराठी भाषा अभ्यास परिषद, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, विदर्भ साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, कोकण मराठी साहित्य परिषद, अभिजात मराठी भाषा परिषद' अश्या अनेक संस्थांचा समावेश आहे.
 अजून खूप काही बोलायचंय तुमच्याशी पण कुठेतरी थांबावं लागेलच ना. शेवटी एकच वचन देईन की तुम्ही तयार केलेला मराठी भाषेचा इतिहास कायम जपत शक्य तितकं मराठी भाषा समृद्ध करण्याचा प्रयत्न करेन आणि तसेच इतरांना देखील त्याचे महत्त्व पटवून देइन.
जय हिंद!
जय महाराष्ट्र !
                                             आपला अनुयायी,
                                               अंकित आंबवणे.

Comments

Popular posts from this blog

कोरोनाचे पत्र

गणेशाचं पत्र