गणेशाचं पत्र
नमस्कार, कसे आहात सर्वजण? खुश आहात ना? माझी आतुरतेने वाट बघताय ना? पण काय त्या कोरोनाने तिकडे संपूर्ण थैमान घातलय म्हणे. त्याच विषयी पत्र लिहिलं आहे. आता पुढील महिन्यात आमचं आगमन होणार. आम्ही दरवर्षी एक महिना आधीच गाड्यांचं रिजरव्हेशन करून ठेवतो. पण ह्या वर्षी कोरोना मुळे गाड्याच बंद आहेत. त्यामुळे अद्याप आम्हाला काहीच रिजरव्हेशन करता येत नाहीये. खरं सांगायचं झालं तर आता इतकी वर्षे तुम्हा सर्वांचे प्रेमाने भरलेले मोदक लाडू, गोड गोड जेवण ह्या सगळ्याची आता सवय झाली आहे. तुम्हा सर्वांचं माझ्यावरचं प्रेम, श्रद्धा, भक्ती हे सर्व पाहता तुम्हाला भेटल्याशिवाय राहवत नाही. म्हणूनच तर मागच्या वर्षी जोरदार पाऊस असूनही आलो होतो. पण ह्या वर्षी गाड्या बंद असल्याने येणं कठीण दिसत आहे. तरी तुमच्यातलेच काही पोलीस आणि डॉक्टर किंवा नर्सेस हे कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. मला खरंच ह्या सर्व लोकांचं फार कुतूहल वाटतं. जर कोरोना दूर झाला तर आमच्या गाड्या देखील सुरू होतील आणि आम्हाला येण्याची संधी सुद्धा उपलब्ध होईल. पण ह्या सगळ्यांमध्ये तुमचा सहभाग देखील फार म...