कोरोनाचे पत्र
नमस्कार! काय मग मंडळी, ओळखलंत ना मला? मी तोच जो सध्या तुमच्या जीवावर टिचून बसलेला आहे. मी तोच ज्याला घाबरून तुम्ही लोकांना हात मिळवण्याचं सोडून आजकाल रामराम करत आहात. मी तोच जो चीनमधून पसरत पसरत तुमच्या देशाची वेस ओलांडून आलो आहे. आता तरी ओळखलंत ना? खरं तर धमकी द्यायलाच आलो आहे. कृपा करून दूर राहा माझ्यापासून. जर माझ्याशी जवळीक करायला आलात तर स्वतःचा जीव मला अर्पण करावा लागेल. तसं बघावं तर टेलिकॉम कंपन्या, रेल्वे स्थानक, न्यूज चॅनल्स सर्वच जण तुम्हाला माझ्यापासून दूर राहण्यास सुचवत आहेत. पण त्यातून जरी तावडीत सापडलात तर मात्र काही खैर नाही. आणि मी काही तुमची शेवटची इच्छा वगरे पूर्ण करणार नाही हो. त्यामुळे जराशी सावधानता बाळगाच. तसं स्वतःचं कौतुक किंवा मोठेपणा सांगावा म्हणून नाही, पण माझी दहशत एका दहशतवाद्याला देखील लाजवेल इतकी भयंकर आहे बरं का. लगेच आपली एन्ट्री झाली काय अन् लगेच सगळे शाळा, कॉलेज सगळं बंद. मोठमोठ्या कंपन्यांनी देखील मला घाबरून कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे. व्वा! काय दहशत आहे आपली. पण एक गोष्ट कळत नाही. ते तुमच्या सैनिक ना पोलीस लोकां...